नागपूर : पुढारी वृत्तसेवा
रस्त्यावर कार शिकत असताना कुणी विहिरीत पडणार आहे का, मात्र ही दुर्देवी घटना नागपुरात घडली. कार शिकत असताना कार अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी येथे सोमवारी रात्री उशिरा घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, रस्त्यावर कार शिकत असताना कार अनियंत्रित झाल्याने रस्त्याकडेच्या विहिरीत कोसळली. बुटीबोरी एमआयडीसी परिसरात बालभारती ग्राउंडवर ही घटना घडली. या तिघांचेही मृतदेह आणि कार मंगळवारी बाहेर काढण्यात आले. मृतांची नावे मिळू शकली नाहीत. रात्री अकरा वाजता तिघे कार शिकत असताना ही कार अनियंत्रित झाली आणि या विहिरीत कोसळली.
कारचा वेग इतका जास्त होता की विहिरीची संरक्षक भिंत तोडून ही कार विहिरीत पडली. जवळपास २० फूट पाणी या विहिरीत होते. या घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुटीबोरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.