उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis
नागपूर

विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्यांना शिक्षा तर होणारच : उपमुख्यमंत्री फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात काँग्रेस पदाधिकारी दोषी आढळले आहेत. याबरोबरच आरोपींना पळून जाण्यातही स्थानिकांनी मदत केल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात कठोरात कठोर कारवाई केली जाईल. पक्ष कोणता हे महत्त्वाचे नाही, गुन्हेगार कोण हे महत्त्वाचे असून कारवाई केली जाईल, यासोबतच पुणे येथील स्कूलबसमधील गैरवर्तन प्रकरणातही आरोपीस अटक करण्यात आली असून कठोर शिक्षा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.3) स्पष्ट केले. नागपूर येथे बांधकाम कामगार मेळाव्यात ते माध्यमांशी बोलत होते.

भाजप आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने यासंदर्भात गुरुवारी (दि.3) नागपुरात निषेध आंदोलनही केले. स्कुल बसमध्ये या मुलींना नको तिथे स्पर्श केल्याचे, गैरवर्तन केल्याचे दोन मुलींबाबत पुढे आल्याचे पालकांच्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे. मागील काही दिवसात शाळांमध्ये वाढलेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता शाळा व्यवस्थापनाने देखील स्कूलबस व्यवस्थेत असलेल्या लोकांची चौकशी करावी, पुरेशी खबरदारी घ्यावी अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यातील घटनेत पोलीस सखोल तपास करीत असून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात कर्नाटकमध्ये करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांच्या आरोपाबाबत बोलताना या लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काहीही माहित नाही असे प्रत्युत्तर दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT