वडेट्टीवार म्हणतात, हे शक्यच नाही, हम तुम जुदा ना होंगे..!  File Photo
नागपूर

वडेट्टीवार म्हणतात, हे शक्यच नाही, हम तुम जुदा ना होंगे..!

वडेट्टीवार हे महायुतीत जाणार मंत्री होणार अशा चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : राजेंद्र उट्टलवार

राज्यात एकीकडे भ्रष्ट मंत्र्यांवरून महायुती सरकार अडचणीत आल्याचे विरोधक सांगत असताना विरोधी पक्षातील गटनेते विजय वडेट्टीवार हेच महायुतीत जाणार मंत्री होणार अशा चर्चा विदर्भासह राज्यभरात सध्या जोरात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर या शक्यता अधिक जोराने पुढे आल्या. माजी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांना मंत्रीपद नक्की असल्याचा दावा केला गेला.

पूर्व विदर्भातील अनेक समर्थक महायुतीच्या गळ्याला लागल्याने या शक्यतांबाबत पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकली. मात्र स्वतः वडेट्टीवार यांच्या गोटातून अशी शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. आज बुधवारी स्वतः काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ता असो वा नसो, आपण काँग्रेसमध्येच राहणार, मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही! या सर्व अफवा आहेत. कधी माझ्या विषयी तर कधी जयंत पाटील यांच्याविषयी उलट सुलट चर्चा केली जाते. मुळात अशा अफवा पसरविणारा लोफर, बदमाश कोण? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

मी काँग्रेसचा शिपाई आहे. मरेपर्यंत येथेच राहणार, माझ्यासारखा पुरोगामी आयडियालॉजीचा माणूस भाजप या जातीयवादी पक्षात किंवा त्यांच्या सहकारी पक्षातही जाऊ शकत नाही. एकंदरीत काँग्रेस आणि मी सोबतच राहणार, हम तुम जुदा ना होंगे...! असेच त्यांनी एकदा स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT