Maharashtra Cabinet Expansion | 'महायुती'चा महाविस्‍तार...! नागपूरमध्‍ये भव्‍य शपथविधी सोहळा संपन्न  File Photo
नागपूर

'महायुती'चा महाविस्‍तार...! नागपूरमध्‍ये भव्‍य शपथविधी सोहळा संपन्न

Maharashtra Cabinet Expansion Live | महायुतीच्या ३३ कॅबिनेट, ६ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: Maharashtra Cabinet Expansion | महाराष्ट्र विधानसभेचा शनिवार २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला. यानंतर तब्बल १३ दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज १० दिवसांनी अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला. महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरमधील राजभवन परिसरात संपन्न झाला आहे. महायुतीच्या ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप-१९, शिवसेना-११ आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

रामदास कदम यांच्या पुत्राने घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ 

शिंदेंच्या सेनेचे योगेश कदम यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र. दापोली खेड विधानसभेतून ते दुसऱ्यांदा आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते शिंदे सेनेसोबतच राहिले.

इंद्रनिल नाईक पहिल्यांदाच मंत्री

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे इंद्रनिल नाईक यांनी पहिल्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली. ते पुसद विधानसभा मतदारसंघातून आहेत. २००४ पासून वसंतराव पाटील  कृषी संशोधनाचे सदस्यआहेत.

मेघना बोर्डीकर; मराठवाड्यातून मंत्री पदाचा नवा चेहरा 

भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परभणीतीव जिंतूर मतदारसंधातून दुसऱ्यांदा आमदार. 

आशिष जैस्वाल जिल्हाप्रमुख ते आमदार

आशिष जैस्वाल १९९९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ते आमदार असा प्रवास. २०१९ ला अपक्ष म्हणून निवडून आले. रामटेक मतदारसंघातून पाचव्यांदा आमदार. 

माधूरी मिसाळ यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

माधूरी मिसाळ यांनी पहिल्‍यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली. पुणे पर्वती मतदारसंघातून निवडून आल्‍या आहेत. पूणे शहर भाजपाच्या माजी अध्यक्ष आहेत. चारवेळा त्‍या आमदारपदी निवडून आल्‍या आहेत.

कोल्हापूरचे प्रकाश आबिटकर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

शिवसेनेचे नेते प्रकाश आबिटकर यांनी पहिल्यांदा मंत्री पदी शपथ घेतली. ते २०१४ पासून सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गारगोटी पंचायत समितीचे अध्यक्ष होते. कोल्हापूरातील राधानगरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व.एकनाथ शिंदेच्या बंडामध्ये त्यांचा सहभाग होता.  २०१९ आणि २२० मध्ये उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून पुरस्कार पटकावला आहे. 

बाबासाहेब पाटील

बाबासाहेब पाटील लातूर जिल्‍ह्यातील अहमदपूर मतदासंघातून निवडून आले आहेत. राष्‍ट्रवादी काँगेसकडून त्‍यांना संधी मिळाली आहे. ते अजित पवार यांच्या बंडानंतर ते त्‍यांच्या बरोबर राहिले होते.

भरतशेठ गोगावले 

भरतशेठ गोगावले यांनी घेतली शपथ. सरपंच ते आमदार असा प्रवास रायगडमधील शिंदेसेनेचा आक्रमक चेहरा, पहिल्‍यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महाड मतदारसंघातून सलग चौथ्‍यांदा ते निवडून आले आहेत. १९९२ पासून ते राजकारणात सक्रीय आहेत.

आकाश फुंडकर

भाजप नेते आकाश फुंडकर यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. माजी मंत्री  भाऊसाहेब फुंडकर याचे ते पुत्र आहेत. सलग ३ वेळा खामगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व. 

नितेश राणे; पहिल्‍यांदाच मंत्रीपदाची शपथ

नितेश राणे यांनी घेतली पहिल्‍यांदाच मंत्रीपदाची शपथ, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते पूत्र आहेत. कणकवली मतदारसंघातून कोकणातील आक्रमक चेहरा, २०१४ पासून सलग तिसऱ्यांदा आमदार म्‍हणून निवणून आले आहेत.

सातारामधून नवीन मंत्रीपदाचा चेहरा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील हे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र आहेत. किसनवीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्ष. २००९ साली पहिल्यांदा विधानसभेवर संधी. सलग ४ वेळा ते साताऱ्यातील वाई मतदारसंघातून आमदार झाले आहे.

प्रताप सरनाईक; फडणवीस सरकारमध्ये पहिल्यांदा संधी

शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून पहिल्यांदा संधी. २००९ पासून चौथ्यांदा ओवळा-माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख.

शिरसाठ यांची पहिल्यांदा मंत्रीपदी वर्णी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाठ यांनी शपथ घेतली छत्रपती संभाजीनगर येथील राजकारणातील प्रमूख चेहरा, शिंदे यांचे सहकारी, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे सलग चौथ्‍यांदा आमदार झाले आहेत. पहिल्‍यांदाच मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

संजय सावकारे

भाजप नेते संजय सावकारे सलग तीनवेळा भुसावळ मतदारसंघाचे नेतृत्त्व करत आहेत. तत्पूर्वी २००९ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले होते.  गिरीश महाराजन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख. 

नरहरी झिरवळ

नरहरी झिरवळ यांनी शपथ घेतली. सरपंच, पं.स अध्यक्ष ते जिल्‍हा परिषद अध्यक्ष राहिले आहेत. दिंडोरी मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार, विधानसभेचे उपाध्यक्ष म्‍हणून काम पाहिले आहे.

जयकुमार गोरे

भाजपचे जयकुमार गोरे हे मंत्री पदाची शपथ घेत आहेत. माण-खटाव मतदासंघातून चौथ्यांदा आमदार. २०१४ काँग्रेसकडून आणि २०१९ मध्ये भाजपमधून ते निवडून आले आहेत. 

शिवेद्रसिंह भोसले

शिवेद्रसिंह भोसले यांनी पहिल्‍यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते वंशज आहेत.

आदिती तटकरे यांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ 

आदिती तटकरे यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. मविआ सरकारमध्ये राज्‍यमंत्री तर महायुतीच्या सरकारमध्ये कॅबीनेट मंत्री होत्‍या. श्रीवर्धन मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडूण आल्‍या आहेत. दोन्ही सरकारमध्ये काम करण्याची संधी. अजित पवार यांच्या राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या त्‍या कन्या आहेत.

दत्तात्रय भरणे

यांनी शपथ घेतली असून, ते इंदापूर मधून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. अजित पवार यांचे अंत्‍यत जवळचे सहकारी म्‍हणून ओळख आहे.पुणे बँकेचे अध्यक्ष होते.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार

आशिष शेलार यांनी शपथ घेतली आहे. ते मुंबईचा भाजपाचा प्रमुख चेहरा आहेत. वांद्रें पश्चीम मतदारसंघातून आमदार, फडणवीसाच्या पहिल्‍या सरकारमध्ये शालेल शिक्षण मंत्री होते. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत.

शंभूराज देसाई

 देसाई  हे पाटण मतदारसंघातून चौथ्यांदा ते आमदार झाले आहेत. २०१४ मध्ये बांधकाम मंत्री होते. मागील शिंदे सरकारमध्ये ते उत्पादन मंत्री होते. सध्याचे  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख.

अशोक उईके

अशोक उईके भाजपाचे आमदार असून यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवाजी शिक्षण संस्‍थेत ते प्राचार्य होते.

पंकजा मुंडे; अखेर राजकीय वनवास संपला

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्या फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्ये ग्रामविकासमंत्री होत्या. २००९ व २००१४ मध्ये परळीमधून आमदार होत्या. त्या सध्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत. मुंडे यांचा गेल्या ५ वर्षातील राजकीय वनवास अखेर संपला आहे. आज दुसऱ्यांदा पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

जयकुमार रावल

जयकुमार रावल यांनी शपथ घेतली, सिंदखेडा मधून ते निवडून आले आहेत. भाजपचे नेते २००९ पासून ते आमदार म्‍हणून निवडूण आले आहेत.

उदय सामंत; शिंदेच्या बंडातील शिलेदार

एकनाथ शिंदेच्या बंडातील प्रमुख शिलेदार होते. रत्नागिरी मतदारसंघातून ५ वेळा आमदार, मागील दोन्ही सरकामध्ये ते मंत्री होते. उदय सामंत

मंगलप्रभात लोढा; सर्वात श्रीमंत आमदार

मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत आमदार अशी त्यांची मागील सरकारमध्ये ओळख होती. मंगलप्रभात लोढा हे भाजपाचे मुंबईमधील प्रमुख नेते आहेत. १९९५ पासून आमदार मलबार हिल या मुंबईतील उच्चभ्रू वस्‍तीमधील आमदार म्‍हणून ओळख. बांधकाम व्यावसाईक असलेले लोढा हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

विद्यमान कृषीमंत्री धनंजय मुडे यांनी घेतली शपथ  

बीडमधील परळी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. महायुती सरकारमध्ये ते कृषीमंत्री होती. मागील तीनही सरकारमध्ये त्यांनी मंत्री पद भूषविले आहे.

संजय राठोड

संजय राठोड यांनी तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बंजारा समाजाचे नेते, २००४ मध्ये पहिल्‍यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. मविआच्या सरकारमध्ये एका तरुणीच्या मृत्‍यूमुळे त्‍यांना राजीनामा द्यावा लागला होता. यवमाळमधील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते म्‍हणून ओळख आहे.

दादा भुसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ आणि जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात . २००४ साली पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले आहे. शक्य ते अशक्य अशी ओळख असणारा नेता म्हणून ओळख. मागील दोन सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदे भूषवली आहेत. आज ते तिसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेत आहेत.

गणेश नाईक यांनी मंत्री पदाची शपथ घेतली

गणेश नाईक यांनी कॅबिनेट मंत्री म्‍हणून शपथ घेतली आहे. ते ठाणे जिल्‍ह्यातील ते वजनदार नेते आहेत. १९९० मध्ये पहिल्‍यांदा ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते.

गुलाबराव पाटील; शाखाप्रमूख ते मंत्री असा प्रवास

गुलाबराव पाटील हेही जळगावचे असून त्‍यांनी गुलाबराव पाटील हेही जळगावचे असून त्‍यांनी यापूर्वी स्‍वच्छता व पाणीपूरवठा मंत्रीम्‍हणून जबाबदारी सांभाळली आहे. जळगाव ग्रामीणमधून ते सलब पाच वेळा निवडून आले आहेत. शिसेनेचे शाखाप्रमूख ते मंत्री असा प्रवास त्‍यांचा राहिला आहे.

गिरीश महाजन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली

भाजपचे गिरीश महाजन जळगाव येथून ते सलग ७ वेळा ते निवडून आले आहेत.

चंद्रकांत दादा पाटील तिसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ

महसूल मंत्री म्‍हणून जबाबादारी पार पाडली आहे. मूळचे कोल्‍हापूरचे असलेले चंद्रकांतदादा पाटील हे पूणे कोथरुड येथून दूसऱ्यांदा निवडून आले आहे. फडणवीस सरकारमध्ये पहिल्‍यांदा महसूलमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्‍यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते उच्च व तंत्रशिक्ष्रण मंत्री होते. आता तिसऱ्यांदा त्‍यांनी शपथ घेतली आहे.

विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहाव्यावेळी घेतली शपथ

कागल मतदारसंघातून ६ आमदार म्हणून निवडून आले आहेत. पाचवेळा विविध मंत्री पदे भूषवली आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे विद्यमान वैद्यकीय शिक्षणंत्री होते.

विद्यमान सरकारमधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

महसूलमंत्री - (2022-2024)

गृहनिर्माणमंत्री - (2019-1019)

विरोधी पक्षनेता (महाराष्ट्र विधानसभा)- (2014-2019)

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेयांनी घेतली मंत्री पदाची शपथ

अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला

"फडणवीस सरकारमध्ये अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला आहे. आज शपथ घेणारे मंत्री हे पुढील अडीच वर्षासाठी शपथ घेणार आहे. त्यानंतर पुढील अडीच वर्ष मंत्री पदं बदलली जाणार आहेत. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र मंत्र्यांकडून लिहून घेतले जाणार आहेत. आज शपथ घेणारे सर्व मंत्री हे अडीच वर्षांसाठी असतील", असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT