नागपूर : पुढारी वृत्तसेवा
देशात सध्या 22 लाख प्रशिक्षित चालकांची गरज असून केंद्र सरकारच्यावतीने 15 हजार चालक पशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यातीलच देशातील पहिल्या प्रशिक्षण केंद्राचे आज उद्घाटन झाले.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आणि स्वयंचलित तपासणी केंद्राचे भूमिपूजन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एम वझलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड सावरमेंढा तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथे पार पडले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. आशिष देशमुख, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, माजी आमदार अनिल सोले, राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अमृतलाल मदान, उपेंद्र कोठेकर, राजीव पोद्दार, एम. वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनीष वझलवार, आशिष वांदिले, अर्चना आशिष वांदिले यांची मुख उपस्थिती होती. यावेळी ‘हसत खेळत सोप्या भाषेत ड्रायव्हिंग शिका’ या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.