Nitin Gadkari File Photo
नागपूर

Nitin Gadkari: टेस्ट ट्यूब बेबीप्रमाणे आता ‘टेस्ट ट्यूब गाय’ तंत्रज्ञानाचा प्रयोग; नितीन गडकरी यांची माहिती

देशी गायींचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे," अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

मोहन कारंडे

Nitin Gadkari

नागपूर : "ज्याप्रमाणे टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान विकसित झाले, त्याचप्रमाणे आता ‘टेस्ट ट्यूब गाय’ अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गायींच्या प्रजननाचा प्रयोग केला जाणार आहे. देशी गायींचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे," अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, विदर्भात मदर डेअरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. नागपुरातून मदर डेअरी दररोज दहा लाख लिटर दूध संकलित करीत आहे. मात्र, कोल्हापूरमध्ये जेवढे दूध उत्पादन होते, तेवढे उत्पादन संपूर्ण विदर्भातही होत नाही, याची खंत वाटते. या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून आणि मदर डेअरीच्या पुढाकारातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.

मोहन भागवत हे स्वतः पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल, याची मला खात्री आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT