नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील मानकापूर रोड उड्डाणपूल परिसरात रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एका भरधाव कंटेनर ट्रकने किमान पाच ते सहा वाहनांना धडक दिली. यात तीन-चार कार, दोन-तीन दुचाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये एक कार दुसऱ्या कारवर आदळल्याचे पाहायला मिळाले. यामुळे छिंदवाडा रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली असून घटनास्थळी मोठा जमाव झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसही पोहोचले दाखल झाले आहेत. या विचित्र, भीषण अपघातात नेमके किती जण जखमी झाले याविषयीची माहिती सर्व भराभर वाहनातून बाहेर पडल्याने अद्याप कळू शकली नाही.