Suniel Shetty Nagpur 
नागपूर

Suniel Shetty Nagpur | सुनील शेट्टीने दिला नागपूरकरांना फिटनेसचा मंत्र, क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ

तरुणांना व्यसनांपासून दूर राहून मैदानावर येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : "मै तुम्हे भूल जाऊ नागपूर!... यह हो नहीं सकता और, तुम्ह मुझे भुला दो मै यह होणें नही दुंगा.. अश संवादाने अभिनेते सुनील शेट्टी यांनी खासदार क्रीडा महोत्सव सीझन-8 च्या उद्घाटन सोहळ्यात नागपूरकरांशी असलेले नाते व्यक्त केले. रविवारी यशवंत स्टेडियमवर हजारो क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ झाला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून आणि संयोजक माजी आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात खेलो नागपूर खेलो या संकल्पनेवर आधारित हा खासदार क्रीडा महोत्सव आहे. यावेळी महापौर निता ठाकरे, राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार श्रीमती मायाताई ईवनाते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, संयोजक तथा माजी आमदार संदीप जोशी, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू कु. रितिका ठक्कर, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. प्रत्येकाने खेळाला जीवनाचा भाग बनवावे. त्यांनी तरुणांना व्यसनांपासून दूर राहून मैदानावर येण्याचे आवाहन करीत फिटनेसचा कानमंत्र सुनील शेट्टीने दिला. कार्यक्रमाची सुरुवात कु. रितिका ठक्कर हिच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. संयोजक संदीप जोशी यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाची रूपरेषा मांडली. २३,८०० खेळाडूंना व्यासपीठ देणाऱ्या या महोत्सवात १८ खेळ प्रकारांत ५,४५० सामने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

८४ वर्षीय आजोबा धावले, ५ वर्षीय चिमुकलाही मैदानात

‘रन नागपूर रन’ आणि फन रन स्पर्धेत ८४ वर्षीय हंसराजजी बालपांडे सर्वात वयस्कर स्पर्धक ठरले. वेशभूषा गटात देवश्री बावनकर, ओम प्रकाश खोब्रागडे व हिमांश कुजरकर यांनी बक्षीस पटकावले. खासदार क्रीडा महोत्सवातील ‘रन नागपूर रन’च्या लकी ड्रॉमध्ये आर्य देवांगण ने बजाज चेतक स्कूटर तर प्रथमेश नंदनवार व दर्शिका भातकुलकर यांनी हिने इव्ही मोटरसायकल जिंकली. याशिवाय सौ. रंजना मेतकर, संदीप वैद्य, ज्ञानेश्वर नकाडे यांनी स्पोर्ट्स सायकल तर खुशी निखारे, गिवेंद्र चौधरी, भावना साखरकर व अवनिश घाटभांडे यांनी स्पोर्ट्स शूज पटकावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT