नागपूर: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल माझे मत चांगले आहे. मात्र अमेरिकेशी आणि काँग्रेसशी संबंध त्यांच्या या संदर्भात वक्तव्याने जोडू नका. अमेरिकेत काही पेपर लिंक झाले म्हणून यातून भारताशी संबंधित काही संबंध जोडले जात असून, पंतप्रधान बदलले जातील, अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. एकंदरीत बिरबलची खिचडी पकवण्याचा हा सगळा प्रकार असल्याचे टीकास्त्र भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना सोडले आहे.
‘जिओ आणि जिने दो’ हा जो संदेश आहे, तो संदेश देण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असतो. संघाचे कार्यकर्ते क्षमाशीलतेसह कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे काम करत असतात. त्यामुळे गेल्या शंभर वर्षांत संघाने केलेले कार्य समजून घेण्यासाठी जगभरातून लोक रेशीमबाग स्मृती भवन येथे येत असतात.
आमदार, मंत्री आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती संघाच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी येथे येत असतात. दरवर्षी आमदार आणि मंत्री येथे येतात. ऊर्जा घेतात आणि ती ऊर्जा घेऊन पुन्हा वर्षभर काम करत राहतात यावर मुनगंटीवार यांनी भर दिला.