जुनी पेन्शनसाठी सुरू असलेले उपोषण स्थगित Pudhari Photo
नागपूर

जुनी पेन्शनसाठी सुरू असलेले उपोषण स्थगित

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : शासन सेवेमध्ये २००५ नंतर दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू होते. परंतु अनेक पदाधिका-यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करावे लागल्याने संघटनेने हे उपोषण रविवारी (दि.6) स्थगित केले आहे. असले तरी संघटनेचा जुनी पेन्शनसाठीचा लढा कायम राहणार असल्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला. राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्यसचिव गोविंद उगले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आमरण उपोषणास बसले होते.

आज जरी आमच्या पदाधिका-यांच्या प्रकृतीच्या विचार करून हा निर्णय घेत आम्ही आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत आहे. तरी आमची जुनी पेन्शनची प्रमुख मागणी पूर्णत्वास गेल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा कोणताही पदाधिकारी शांत बसणार नाही. जुनी पेन्शनचा हा लढा अविरतपणे सुरूच राहील.
- वितेश खांडेकर, राज्य अध्यक्ष म.रा.जुनी पेन्शन संघटना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT