नागपूर विद्यापीठात छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा साकारणार आहे  (Pudhari Photo)
नागपूर

Nagpur University | नागपूर विद्यापीठात लोक सहभागातून साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदंडधारी पुतळा

जगातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच पुतळा

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Shivaji Maharaj statue

नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा नागपुरात उभारला जाणारा सर्वात मोठा पुतळा कांच, धातूचा राहणार असून या सिंहासनारूढ पुतळ्याची उंची 32 फूट असून त्यावरील छत्र सात फुटाचे राहणार आहे. पुतळ्याचे वजन दहा हजार किलो असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात राजदंड राहणार आहे. जगातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच पुतळा राहणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक प्रसंगाच्या वेळेचा हा भव्य सिंहासनारूढ पुतळा उभारण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या हस्ते या निर्माण कार्याचा शुभारंभ पार पडला.

विद्यापीठाच्या महाराजबाग चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात आयोजित कार्यक्रमाला कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, आमदार अभिजीत वंजारी, माजी महापौर शेखर सावरबांधे, समितीचे सचिव मंगेश डुके, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, विद्यापीठ अभियंता विनोद इलमे, उद्यान अधीक्षक प्रवीण गोतमारे, केसीसी कन्स्ट्रक्शनचे जयंतराव खडतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून राज्यभिषेकाच्या वेळेच्या पुतळ्याची निवड करण्यात आली आहे. इतिहासकारांनी लिहिलेल्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यानुसार पुतळ्याची उभारणी होणार आहे. पुतळ्या सोबतच संग्रहालय आणि ग्रंथालय देखील उभारले जाईल यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास प्रदर्शित केला जाईल. लोक सहभागातून या पुतळ्याचे निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT