ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र ऊट्टलवार  
नागपूर

Senior journalist Rajendra Uttalwar passes away |ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र ऊट्टलवार यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र ऊट्टलवार यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : 'दैनिक पुढारी'चे नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र ऊट्टलवार यांचे आज (शुक्रवारी) सकाळी कर्करोगावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने नागपूरसह विदर्भातील पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली असून शोककळा पसरली आहे.

राजेंद्र ऊट्टलवार हे मागील काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या तोंडाच्या कर्करोगावर नागपूर येथे शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. मात्र गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.आज शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

उट्टलवार यांनी पुढारी, नागपूर पत्रिका, जनवाद, देशोन्नती या आघाडीच्या दैनिकांमध्ये सुमारे 35 वर्षे पत्रकारिता केली. दैनिक जनवाद आणि दैनिक देशोन्नतीमध्ये त्यांनी एक प्रभावी मुख्य बातमीदार म्हणून  बरीच वर्षे काम केले. कर्करोगावरील शस्त्रक्रियेनंतरही ते 'दैनिक पुढारी'साठी नियमित वृत्तांकन करीत होते. पुढारी परिवाराने वरिष्ठ पत्रकार, उत्तम बातमीदार गमावला आहे.

पत्रकारितेप्रती असलेली निष्ठा, कामाप्रती समर्पण आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेवटच्या क्षणापर्यंत सुरू ठेवलेले पत्रकारितेचे व्रत ही त्यांची ओळख होती. आजारपणाशी झुंज देतानाही त्यांनी पत्रकारितेतील आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई आणि बहिण एवढा परिवार आहे.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी, मित्र परिवार आणि विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आणि पत्रकारितेशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहिलेला पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT