Bombay High Court Nagpur Bench Building Pudhari
नागपूर

Nagpur High Court News: 'आय लव्ह यू' म्हणणे म्हणजे विनयभंग नाही; उच्च न्यायालयाची टिप्पणी

i love you legal judgment: विनयभंग अथवा लैंगिक छळाच्या चौकटीत बसत नाही

पुढारी वृत्तसेवा

Bombay High Court Nagpur Bench judgment on love proposal

नागपूर : 'आय लव्ह यू' म्हणणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विनयभंग होत नाही. हेतुपुरस्सर केलेली ती लैंगिक शोषणाची कृती होत नाही. ही कृती त्या व्यक्तिविषयीची प्रेमभावना व्यक्त करणे असल्याचे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. न्या उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

नागपुरातील एका आरोपींवर 2015 साली विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसात दाखल तक्रारीनुसार पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना आरोपीने अडवून तिचा हात धरत नाव विचारले आणि 'आय लव्ह यू ' असे म्हटले. यानंतर घाबरलेली मुलगी घरी परतली आणि झालेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 2017 साली सत्र न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधान आणि पॉक्सो कायद्यातर्गंत दोषी ठरवत विविध कलमांनुसार दोषी ठरविले आणि तीन वर्षांची शिक्षा ठोठावली.

आरोपीने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने निर्णय देताना 'आय लव्ह यू' हे शब्द कायद्याच्या चौकटीत लैंगिक शोषणाचा हेतू सिद्ध करीत नाही. या प्रकरणातील घटनाक्रम, साक्ष पुरावे लक्षात घेता आरोपीचा उद्देश लैंगिक शोषण करण्याचा होता, असे दिसून येत नाही. किंबहुना यासंदर्भातील पुरावे देण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. अयोग्य स्पर्श, कपडे बळजबरीने काढणे, अश्लील हावभाव किंवा महिलांना लज्जा भंग करण्याच्या हेतूने केलेली कुठलीही कृती म्हणजे लैंगिक हेतू अशी कायदेशीर व्याख्या आहे.

मात्र, सदर घटना विनयभंग अथवा लैंगिक छळाच्या चौकटीत बसत नाही. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीप्रती प्रेम व्यक्त व्यक्त करण्यासाठी 'आय लव्ह यू' असे शब्द वापरत असेल. तर त्यामागील हेतू हा लैंगिकच होता, असे ठामपणे म्हणता येणार नाही, असेही या आदेशात उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT