नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विदर्भाचे नेते,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. आपण आपल्या प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सलील देशमुख यांच्या राजीनाम्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले सुनील देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळीच ते अजित दादांच्या राष्ट्रवादीत किंवा भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा होते आता पुन्हा एकदा त्यांच्या राजीनामा नाट्याने वातावरण तापले आहे.
सध्या त्यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुठलेही महत्त्वाचे पद नसल्यामुळे काही महत्त्वाचे पद देऊन त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय केले जाते का,किंवा ते इतर पक्षांची वाट धरतात हे येणारा काळच ठरविणार आहे.