Salil Deshmukh Pudhari
नागपूर

Salil Deshmukh NCP | सलील देशमुख नागपूर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षपदी निवड; प्रवक्तेपदी प्रवीण कुंटे-पाटील

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांनी पक्षाचे विदर्भ युवा प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे

पुढारी वृत्तसेवा

Nagpur NCP District President

नागपूर : राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचे युवा नेते सलील अनिल देशमुख यांची नागपूर पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी प्रवीण कुंटे-पाटील यांच्याकडे होती. आता कुंटे पाटील यांची पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत प्रदेश प्रवक्ता व सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र  सलील यांनी पक्षाचे विदर्भ युवाप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. खा सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यानंतर लगेच या घडामोडी झाल्या. त्यांनी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश  उपाध्यक्षपदी म्हणूनही काही काळ  कार्यभार सांभाळला.

देशमुख हे जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणूनही निवडून आले.त्यांनी  २०२४मध्ये काटोल विधानसभेची  निवडणूक पित्याऐवजी लढवली मात्र,  भाजपचे चरणसिंह ठाकूर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. सलील यांनी वेळोवेळी संत्रा उत्पादक शेतकरी,  रोजगार व मतदारसंघातील विविध विकासाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT