Rashtriya Swayamsevak Sangh Centenary
नागपूर : केवळ हिंसक आंदोलन हे समाधान देऊ शकत नाही.आंदोलनामुळे केवळ मतभेद निर्माण करून मनभेद निर्माण करणे,असंतोष भडकवणे अशी कार्यपद्धती आहे,हे पूर्वापार चालले आणि आताही सुरू आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज वर्तमान घडामोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. परकीय शक्ती याचाच गैरफायदा घेत देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात . इंग्रजांनी तेच केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी समारोप, विजयादशमी,शस्त्रपूजन निमित्ताने ते रेशिमबाग येथील सोहळ्यात बोलत होते. यावेळी माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, श्रीमती धनखड, इस्रायलचे कॉन्सिलर जनरल प्रमुख यांनीव रेवाच अतिथी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, ज्येष्ठ पत्रकार संजय गुप्ता, विदर्भ, महानगर संघचालक, संत महंत, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुद्धिभेद नको यासाठी, आम्हाला सतत सामूहिक प्रयत्न करावे लागतील. संघाला प्रतिष्ठा, श्रेय नको, ते निरंतर काम करीत राहणार आहे. खरेतर आज विरोध केला जात असला तरी वंदे मातरम स्वातंत्रतेची प्रेरणा होती, त्यामुळे इंग्रजांना फाळणी मागे घ्यावी लागली. तुष्टीकरण मानसिकतेमुळे देशाची फाळणी झाली,कलह सुरू झाला- वंग भंग च्या फाळणीला विरोध वंदे मातरम मुळे झाला.
वंदे मातरमला कुणाचाही विरोध नको, ते देश एकसंघ ठेवणारे राष्ट्रगीत आहे. सगळ्या पंथ, भाषा चे आधार आहे .आपल्याला एकसूत्रतेत बांधणारा हा धागा आहे . आज विविध देशातील घडामोडी पाहू जाता राष्ट्रीय मूल्याच्या आधारावर जगाला विविध समस्येपासून मुक्त करण्याचे कर्तव्य,सामर्थ्य भारताचे आहे यावर त्यांनी भर दिला. प्रारंभ स्वयंसेवकांच्या आकर्षक कवायतीने झाला. सोमवारी इतिहासात प्रथमच तरुणांचे 9 ठिकाणावरून पथसंचलन पार पडले.
तंत्रज्ञान रोखू शकत नाही, मात्र केवळ उपभोगवाद नको. नेपाळमध्ये जे झाले ते का झाले,पूर्ण हिमालय क्षेत्रात एकागी विकास सुरू झालाय. मूळ उपाय समग्र आणि संतुलित विकास विचार व्हावा, एआयचा उचित वापर केला नाही तर त्यातुन अनुचित बाहेर निघते याकडेही भागवत यांनी लक्ष वेधले.