Revenue Servants Strike Suspended
नागपूर : राज्यातील 12 हजार महसूल सेवकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी ठरली असून येत्या 16 ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. सर्वांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
चतुर्थ श्रेणी मिळावी, या मागणी साठी नागपूरसह राज्यभरातील महसूल सेवक आंदोलनावर होते. नवव्या दिवशी यात मार्ग निघाला.महसूल मंत्री बावनकुळे काल सोमवारी रात्री अकरा वाजता थेट नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्यांची भेट घेत विचारपूस केली. आमरण आंदोलनाचा मार्ग सोडण्याची विनंती करत येत्या 16 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे बैठक लावल्याचे जाहीर केले. यावेळी समाधान होईल असा तोडगा बैठकीत काढू, असे आश्वासन दिल्यानंतर महसूल सेवकांनी आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.