Ranveer Singh Nagpur RSS Headquarters Visit Pudhari
नागपूर

Ranveer Singh | अभिनेता रणवीर सिंगची गुपचूपपणे रेशीम बागेतील स्मृती मंदिराला भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यापासून या भेटीबाबत खूपच गोपनीयता पाळली गेली

पुढारी वृत्तसेवा

Ranveer Singh Nagpur RSS Headquarters Visit

नागपूर : रुपेरी दुनियेत अनेक विक्रम करणारा धुरंदर हिंदी चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंग याने अतिशय गुप्तपणे संघ मुख्यालय आणि रेशीम बागेतील स्मृति मंदिराला भेट दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यापासून या भेटीबाबत खूपच गोपनीयता पाळली गेली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी भेटल्यानंतर रणवीर सिंग रेशीमबागेत पोहोचला. आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला त्याने अभिवादन केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास दीड तास संघ मुख्यालयी आणि सुमारे चार तास तो आणि त्याच्यासोबत इतर चार व्यक्ती नागपुरात होते. रात्री विशेष विमानाने सर्वजण रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT