नागपूर

‘मविआ’च्या बैठकीला न बोलवणे दुर्दैवी: डॉ. राजेंद्र गवई

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मविआची नुकतीच बैठक झाली. या बैठकीसाठी आमंत्रण नसल्याने रिपाइं गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी संताप व्यक्त केला आहे. बैठकीला न बोलवणे हे अतिशय दुर्दैवी असल्याचे गवई यांनी म्हटले आहे.

गवई म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आमच्या पक्षाची देखील आहे. मला डावललं गेले तर १० तारखेला सोलापूरला रिपाइंचा मोठा मेळावा आहे. अमरावतीसह ५ जागा आम्हाला देण्यात याव्यात, अशी मागणी गवई यांनी केली. अमरावती लोकसभा आम्ही मिळविण्यासाठी ठाम आहे, नाही दिली तर आम्ही उमेदवार पाडण्याची ताकद ठेवतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अकोला लोकसभा व इतर पाच जागांसह वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागावरून मविआत अनिश्चितता कायम असताना आता गवई यांच्या मागणीवरून डोकेदुखी ठरणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT