विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांवर पहाटे प्रतिबंधात्मक कारवाई Pudhari Photo
नागपूर

विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांवर पहाटे प्रतिबंधात्मक कारवाई

वेगळ्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता काळेझेंडे दाखविण्याच्या होते तयारीत

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

अनेक वर्षांपासून विदर्भवादी नेते वेगळ्या विदर्भाची मागणी करीत आहेत. परंतु  मागणीला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याप्रसंगी नागपुरात काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या आधीच पहाटे अंबाझरी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी वेगळ्या विदर्भ राज्याचे बाबतीत विदर्भवादी नेत्यांनी भेटीकरता वेळ मागितलेला होता. जर भेटीला वेळ मिळाला नाही, तर विदर्भवादी नेते आणि त्यांच्या सहकार्यांकडून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कलम 168 बी.एन.एस.एस. अन्वये दखलपात्र गुन्हा प्रतिबंध करण्यास व पोलीस ठाणे ह‌द्दीत शांतता रहावी या करिता नोटीस बजावून विदर्भवादी नेते आणि सहकार्यांवर पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT