नागपूर : निवडणुका आल्यावर पक्षाकडून तयारी होतच असते. भारतीय जनता पक्ष ग्राउंड लेव्हलवर काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे ताकदीने आम्ही महापालिका लढू आणि जिंकू, असा विश्वास भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि.२७) व्यक्त केला. मुंबई महापालिका भाजपची पूर्व तयारी संदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले, मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशातील मोठे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले. ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा देऊन अर्थकारण सुव्यवस्थित केले. मंदीच्या काळात अर्थकारणाची घडी नीट बसवणारा नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. इकॉनोमी हा विषय आल्यानंतर मनमोहन सिंग यांचं नाव देशात कधीच मागे राहू शकत नाही.