नागपूर : माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रकाश गजभिये काश्मीरमध्ये सोनमर्ग येथे बर्फवृष्टीत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 24 जानेवारी रोजी घडली. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधून योग्य ते सहकार्य करण्यास सांगितले. सध्या ते शेरे काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस श्रीनगर येथे उपचारार्थ दाखल असून एसकेआयएमएसचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. फारूक जान यांच्या मते रुग्णालयात आणले तेव्हा रुग्ण अत्यवस्थ होते. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारत असल्याची माहिती संचालक अश्रफ गनिया यांनी दिली.