नागपूरमध्ये दिवाळी संपली तरी पावसाने (Rain) आपली हजेरी कायम ठेवली आहे. आज शनिवारी दिवसा रिमझिम पाऊस झाल्यानंतर रात्री आठच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. यामुळे नागपूर शहरात काहीसा गारठा वाढल्याचे जाणवले आणि उकाड्यापासून नागरिकांना सुटका मिळाली.
याआधी नवरात्री आणि दसऱ्याच्या काळातही पावसाने हजेरी लावत गरबा खेळणारे आणि आयोजकांची तारांबळ उडवली होती. दिवाळीच्या तोंडावर वर्तवलेला पावसाचा अंदाजही खरा ठरला.
मात्र, या अवकाळी पावसामुळे आधीच अतिवृष्टीने संकटात असलेल्या शेतकऱ्यांची (Farmers) चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १५ ते किमान १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे. काही भागांत हा अंदाज खरा ठरला आहे. या हवामानामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन केले आहे.