नागपूर : अभाविपने नेहमीच शिक्षण क्षेत्रात गुणात्मक दर्जा आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी विद्यार्थी हितासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुढाकार घेतला आहे. नुकतेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने PET परीक्षेचे परिपत्रक काढले. विद्यार्थ्यांना आभासी पद्धतीने संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून परीक्षा फॉर्म भरावयाचा असल्याने अनेक विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले.
अभाविप नागपूर महानगरद्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र–कुलगुरू राजेंद्र काकडे यांना निवेदन देत पेट प्रवेश परीक्षेच्या फॉर्मची 10 दिवसांनी मुदत वाढविण्याची मागणी केली. यावेळी नागपूर महानगर मंत्री दुर्गा भोयर, नागपूर महानगर सहमंत्री शुभ जयस्वाल, धरमपेठ नगर अध्यक्ष किशोर पाटील व अभाविप विद्यार्थी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.