पंकजा मुंडे ( संग्रहित छायाचित्र) File photo
नागपूर

नेता विशिष्ट समाजाचा नसतो : पंकजा मुंडे

Pankaja Munde : चांगल्या कामाने जी ओळख निर्माण होते त्या नावाने ओळखल्यास आवडेल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने माजी मंत्री तसेच ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले  छगन भुजबळ नाराज आहेत. या चर्चेवर राज्याच्या पर्यावरणमंत्री पकंजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कुठल्याही नेत्याला हा ओबीसींचा, मराठ्यांचा असे लेबल लावले जाऊ नये. कुठलाही नेता हा सर्वच समाजाचा असतो.फक्त एखाद्या जातीत जन्म घेतला म्हणून त्या समाजाच्या नावाने त्याला ओळखले जाऊ नये. अशी ओळख आम्हाला नको आहे. त्यापेक्षा चांगल्या कामाने जी ओळख निर्माण होते त्या नावाने आपल्याला ओळखल्यास आवडेल असे  माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या.

छगन भुजबळ आणि भाजपच्या जवळीकीविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ते महायुतीत आहे. राष्ट्रवादी आमच्याच महायुतीचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक आहे. ते विरोधी पक्षात नाहीत. त्यामुळे आमच्याच चर्चा होत असते. ते भाजपात येणार नाही, राष्ट्रवादी सोडणार याविषयी मला फार काही माहीत नाही. सुप्रीम कोर्टाने लाडक्या बहिणी संदर्भात काय म्हटले, त्याबद्दल मला माहित नाही.  त्यामुळे त्यावर बोलणार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT