नागपूर: ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला चीनने मदद केली. शनिवारी (दि.10 जानेवारी) मोदी सरकार त्याच चीनला भारतात गुंतवणुकीसाठी या अशा पद्धतीचे निमंत्रण देत आहेत. रेड कारपेट पसरवले जात असल्याचे टीकास्त्र एआयएम आयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सोडले. मनपा निवडणुकीच्या निमित्ताने ताजबाग येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही यावेळी त्यांनी निशाणा साधला. बहुतांशी मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सिमेंटचे रस्ते करण्यात आलेले नाहीत असा आरोप केला. उपमुख्यमंत्रीअजीत पवार, एकनाथ शिंदे, चंद्रबाबू नायडू या सर्वांनी मिळून वक्फ संबंधीचा कायदा तयार केला, यासाठी समर्थन दिले.
या माध्यमातून मुस्लिम समाजाची जमीन बळकावण्याचा, हिसकावून घेण्याचा डाव आहे. आम्ही केवळ अशांना मतदान करीत राहिलो तर आपल्या घरादारावर बुलडोजर चालविला जाणार हे निश्चित आहे असेही यावेळी ओवेसी म्हणाले.