नागपूर

चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक!

Shambhuraj Pachindre

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात उत्तराखंड येथे पोहचत असल्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर ताण पडत आहे. भाविकांना सुलभ व सहजपणे ही यात्रा करता यावी यासाठी हे बदल करण्यात येत आहेत. ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय चारधाम यात्रेचे नियोजन करु नये असे आवाहन उत्तराखंड राज्याच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी केले आहे.

चारधाम यात्रेतील दर्शन प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच भाविकांना ऑनलाईन नोंदणीनुसार सहज दर्शन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्तराखंड प्रशासनाने https://registrationandtouristcare.uk.gov.in संकेतस्थळ सुरु केले आहे. व्यवस्थेच्या दृष्टीने ३१ मेपर्यंत व्हीआयपी दर्शनांची सुविधा बंद करण्यात आली आहे.

जेष्ठ नागरिक, तसेच वैद्यकीय उपचार घेत असलेल्या नागरिकांना यात्रा सुरु करण्यापूर्वीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधित उत्तराखंडच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागपूर विभागातील चारधाम यात्रेसाठी नियोजन केलेल्या सर्व भाविकांनी ऑनलाईन नोंदणी करुनच प्रवास करावा तसेच यात्रेदरम्यान होणारी गैरसोय व गर्दी टाळावी, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT