नागपूर: समाजाचे, देशाचे काय हा विचार मागे पडला. माझे काय होणार हा विचार आधी नव्हता, आज ज्या पक्षाची सत्ता तिकडे जा, सत्ता गेली की दुसरीकडे जा, यात निष्ठावंत बाजूला राहतात. ना डावे ना उजवे आज संधीसाधू राजकारण झाले आहे. या वास्तवाकडे सोमवारी (दि.12 जानेवारी) केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष वेधले. अभिनेत्री गिरिजा ओक यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.
भाजप महानगरतर्फे चना पोहा विथ नितीनजी हा कार्यक्रम सक्करदरा लेक गार्डनमध्ये आज सोमवारी रात्री आयोजित करण्यात आला. यावेळी विकसित नागपूरच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. काही गंमती जमती गडकरी यांनी सांगितल्या. सिमेंट रस्त्यामुळे शहरात पाणी साचते या अडचणी खऱ्या नाही. आता खूप आऊटलेट दिल्याचे सांगितले.
नाग नदीमधून मी नावेने अंभोरा जाणार, हे स्वप्न पूर्ण करणार ड्रेनेज सिस्टिम सुधारणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. आपले महालमधील जीवन, बालपण वेगळेच होते. आपसात उत्तम संबंध होते. नागपूरमध्ये मी राजकारणात आलो तेव्हा महाल नगर भवनात मनपाची मीटिंग होती. त्याकाळी आम्ही मडके फोडण्याचे काम केले. आम्ही निवडणूक जिंकत नव्हतो. राजे तेजसिंगराव हरले, पाण्यासाठी त्यांच्या वाड्यात गेलेल्या माणसाला कुत्रा चावला आणि कुत्र्याने निवडणूक जिंकून दिली. एकनाथराव जोग जिंकले.
यावेळी निवडणूक काहीच कठीण नाही. 101 टक्के आम्हीच जिंकणार, नागपुरात खूप काम केले आम्ही, आता शंका एकच मागचा रेकॉर्ड आम्ही मोडणार की नाही. मिहान रोजगाराच्या संधी वाढल्या, पर्यटन वाढले यावर भर दिला. मी दिल्लीत जायला तयार नव्हतो. पण आता मात्र मी पूर्ण दिल्लीकर झालो आहे. नागपूर आणि दिल्ली आता डायरेक्ट फ्लाईट असल्यामुळे मुंबईत फारसा जात नाही. मी सहा समोसे खायचो, आता खूप मर्यादा आल्या. मी रोज एकच विचार करतो आज नाश्ता काय उद्या काय जेवणार, रोज मेन्यू कार्ड बघून, मी रेसिपी करून बघतो.
कोव्हिडमध्ये मी एकदा पावभाजी चांगली केली. नातवांना आवडली, घरी अडचण झाली. सांबर वाडी,पुरणपोळी कधीही आवडते. कांचन सारखी सांबार वडी जगात कुणी करीत नाहीत.खाण्यापिण्याची मजा असल्याने काँग्रेसच्या बंगल्यातील मोर माझ्या बंगल्यात येतात कारण त्यांना पक्ष नव्हता असेही गंमतीने सांगितले.