'उत्तम नर्सरीचे नियोजन आणि संत्रा उत्पादकांसाठी सुधारित धोरण' या विषयावरील बैठकीत बोलताना नितीन गडकरी  (Pudhari Photo)
नागपूर

Nagpur Orange Quality | संत्र्याचा दर्जा वाढवण्यासाठी नर्सरी कायद्यात बदल सुचविणार : नितीन गडकरी

Nitin Gadkari | 'उत्तम नर्सरीचे नियोजन आणि संत्रा उत्पादकांसाठी सुधारित धोरण' या विषयावर बैठकीचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Nursery Act amendment

नागपूर: संत्रा ही विदर्भाची शान असून त्याचा दर्जा अधिक चांगला करून जागतिक बाजारपेठेत निर्यात योग्य बनवण्यासाठी नर्सरी सक्षम करणे आवश्यक आहे. या दृष्टीने राज्य आणि केंद्र शासनाच्या कृषी धोरणात आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी व फलोत्पादन मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

'उत्तम नर्सरीचे नियोजन आणि संत्रा उत्पादकांसाठी सुधारित धोरण' या विषयावर आयोजित बैठकीत गडकरी बोलत होते. गडकरी यांनी स्पष्ट केले की, संत्र्याचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवायची असेल, तर रोगमुक्त व उच्च प्रतीच्या कलमांची नर्सरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी गांभीर्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. सरकार, कृषी विद्यापीठ आणि राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्था यांची कार्यपद्धती निश्चित हवी, स्पेन व इस्त्रायलमध्ये पाहिलेले फलोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान व नर्सरी व्यवस्थापन आपणही आत्मसात केले पाहिजे. राज्यातील विद्यमान नर्सरी कायद्यात सुधारणा करून दर्जेदार आणि रोगमुक्त रोपवाटिका उभारण्यासाठी धोरण तयार केले जावे, असा आग्रह राज्य आणि केंद्र सरकारकडे आपण धरणार आहे.

या बैठकीस ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी, आंबा विषयातील तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पंचभाई, फळशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शशांक भराड, जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र मनोहरे, राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्राचे डॉ. दास, महा ऑरेंजचे अध्यक्ष श्रीधरराव ठाकरे, अ‍ॅग्रोव्हिजनचे सुधीर दिवे, डॉ. प्रवीण भालेराव यांच्यासह नर्सरीधारक आणि संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT