Neet Paper leak | नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले दुरध्वनीवरुन कुटुंबियांचे सांत्वन 
नागपूर

Neet Paper leak | नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले दुरध्वनीवरुन कुटुंबियांचे सांत्वन

विद्यार्थीनी मुळची मध्यप्रदेशातील, वडीलांसोबत नागपूरात राहून करत होती नीटची तयारी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर -नीट परीक्षा २०२६ मधील पेपरफुटी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून मध्यप्रदेशातील रहिवासी कु. आकांक्षा चतुर्वेदी हिने आत्महत्या केल्याची घटना घडली. आकांक्षा ही नागपूर येथे आपल्या वडिलांसोबत राहून या परीक्षेची तयारी करत होती.

या दुर्दैवी घटनेची दखल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली. त्यांनी आकांक्षाच्या आई-वडिलांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांना धीर दिला.

आज नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी चतुर्वेदी कुटुंबीय नागपूरमध्ये परतल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी परिवारातील सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या.

या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आणि न्याय सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT