राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले.  Pudhari Photo
नागपूर

इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

NCP protest Nagpur | व्हेरायटी चौकात सरकारविरोधात एल्गार

राजेंद्र उट्टलवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे व्हेरायटी चौकात प्रदेश युवक कार्याध्यक्ष शैलेंद्र तिवारी व युवक शहराध्यक्ष अनिल बोकडे यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात आज (दि. १८) आंदोलन करण्यात आले. (NCP protest Nagpur)

सध्या कच्च्या तेलाच्या किंमती चार वर्षाच्या निचांकी पातळीवर प्रति बॅरल ६५.४१ डॉलर आहेत. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये किंमत प्रति बॅरल 63.40 डॉलर होती. सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर 12 ते 15 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 6 ते 7 रुपये नफा कमवत असूनही, तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षातून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केलेल्या नाहीत. सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढवून जनतेच्या पैशाची लूट करत आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारण्यात आले. सध्या राज्यात युवकांना रोजगार नाही. बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. लोकांच्या हातात काम नाही आणि वाढत्या महागाईमुळे जनता खूप त्रस्त आहे.

आंदोलनामध्ये महिला शहर अध्यक्ष रेखाताई कृपाले, राजू सिंग चव्हाण, मिलिंद वाचनेकर, अमित पिचकाटे, रोहित मोटघरे, चंद्रकांता जैस्वाल, दिनेश काळबांडे , सारंग साखरे, बलराम मनुजा, कमलेश बांगडे, प्रशांत बसिने, सुमित बसिने, आयुष लोणारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT