Ajit Pawar asthi kalash darshan Pudhari
नागपूर

NCP Nagpur | अजित पवारांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; जुन्या आठवणींना उजाळा

Nagpur NCP | शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसाठी गणेशपेठ येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

Ajit Pawar Asthi Kalash Darshan

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ लोकनेते अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थिकलश दर्शनाच्या निमित्ताने आज (दि.३) पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. नागपुरात विदर्भ स्तरीय अधिवेशन निमित्ताने या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले होते. यानंतर हिवाळी अधिवेशनासाठी दादा नागपुरात आले होते. अनेकांकडे भेटीगाठी झाल्या. आज या सर्व आठवणीना उजाळा मिळाला.

सोमवारी रात्री हा अस्थिकलश नागपूर येथे पोहोचला. आज शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसाठी गणेशपेठ येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. शहरातून गणेशपेठ, महाल, गांधी पुतळा, वर्धमान नगर मार्गे रॅलीने नंतर श्रीक्षेत्र अंभोरा येथे अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट नेते माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, प्रवक्ते प्रवीण कुंटे, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर,नूतन रेवतकर ,नगरसेविका आभा पांडे, माजी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आदी सर्व पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT