नागपूर

Ranjanatai Kawade Death News |आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. रंजनाताई कवाडे यांचे निधन

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रा. रंजनाताई कवाडे यांचे आज शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.१० वाजता नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांच्या त्या मातोश्री तर लाँग मार्चचे प्रणेते, पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी होत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना आणि राष्ट्रीय विद्यार्थी सेनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

त्यांच्या पश्चात मुलगा जयदीप, मुलगी वैशाली, मुलगी सुजाता, सून प्रतिमा, नात निरिजा, नात अस्मिता तसेच नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. प्रा. रंजनाताई कवाडे यांची अंत्ययात्रा आज शनिवारी दुपारी ४.३० वाजता नागपुरातील लक्ष्मीनगर येथील निवासस्थानातून निघून मोक्षधाम घाट येथे जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT