नागपूरातील महिलांनी केला पाकिस्‍तानच्या भ्‍याड हल्‍ल्‍याचा निषेध  Pudhari Photo
नागपूर

Pahalgam Terror Attack | नारीशक्ती सिंदूर यात्रा, महिला एकवटल्या रस्त्यावर

नागपूरातील महिलांनी केला पाकिस्‍तानच्या भ्‍याड हल्‍ल्‍याचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - काश्मीरमधील पहेलगाम येथे भारतीयांवर दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला हा समस्त मानवतेला काळीमा फासणारा प्रसंग म्हणून भारतीयांच्या मनावर आघात करून गेला. परंतु नियोजित असा प्रतिकार भारत सरकार आणि भारतीय सैन्याने आतंकवाद्यांच्या विरोधात केला. सरकार आणि सैन्याच्या पराक्रमाला पाठिंबा दर्शविण्यासाठी, तसेच आतंकवाद्यांचा निषेध करण्यासाठी नागपुरातील समस्त नारी शक्ती गुरुवारी रस्त्यावर एकत्रित आल्या. महिला भाजपातर्फे ही सिंदूर यात्रा आयोजित करण्यात आली .

यावेळी प्रहार समाज जागृती संस्थेच्या सचिव (रिटायर्ड) फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे आणि रक्षणम् डिफेन्स अकादमी, फेटरीच्या अध्यक्षा राजेश्वरी वानखेडे यांनी संबोधित केले. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या रॅलीत महानगर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, महिला आघाडी अध्यक्ष प्रगती पाटील, महामंत्री मनीषा काशीकर, अर्चना डेहणकर, नंदाताई जिचकार, अश्विनीताई जिचकार, सारिका नांदुरकर, निशा भोयर निकिता पराये, मीरा कडवे,पद्मा चांदेकर,राजेश्वरी वानखेडे (गेस्ट ),शिवाली देशपांडे (गेस्ट) श्रद्धा पाठक नीता किटकरू, वर्षा चौधरी सरिता माने , संतोष लड्डा , कविता इंगळे, कविता सरदार, रुपल दोडके संध्या चतुर्वेदी आदी माजी नगरसेविका उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT