परमविरसिंग यांनी केलेल्या आरोपांना सलील देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Pudhari News Network
नागपूर

फडणवीस, परमविरसिंग, वाझे यांचीही नार्को टेस्ट करा : सलील देशमुख

पुढारी वृत्तसेवा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सहा महिने मिशा काढून ओळख लपवित फिरणारा, सात वेळा कोर्ट, चांदीवाल आयोगापुढे न येणारा परमविरसिंग आणि कारागृहात असलेला सचिन वाझे कुणाच्या इशाऱ्यावर हे सर्व आरोप करतोय हे जगाला माहित आहे. नार्को टेस्टची मागणी त्यांनी केल्याचे आज समजले. मात्र, या प्रकरणी जबाबदार असलेल्या सर्वांची, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पोलिस आयुक्त परमविरसिंग, सचिन वाझे या सर्वांचीच नार्कोटेस्ट करा, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र जि. प. सदस्य सलील देशमुख यांनी केली.

सलील देशमुख यांचे आरोपांना प्रत्युत्तर

सलील यांची पाया पडण्याची तयारी होती. आपल्याला भेटून आरोप मागे घेण्याचा आग्रह केला. डीजी करण्याचे आमिष दाखविले, असे आरोप परमविरसिंग यांनी केल्यानंतर सलील देशमुख यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. आपण फार पूर्वीपासून त्यांना ओळखतो, आधीच्या भेटीचे संदर्भ ते आता देत असून येनकेन प्रकारे अडकविण्याचा त्यांचा प्रयत्न होता, हे यापूर्वीच उघड झाले आहे. अनिल देशमुख यांनी थेट फडणवीस यांनाच घेरल्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांचे मानसिक संतुलन बिघडले, यामुळेच ते आपल्यावर काहीही आरोप करीत आहेत, असा आरोप केला.

चौकशीचे शुक्लकाष्ट संबंधितांमागे लागण्याची शक्यता

अनिल देशमुख त्यांचे सुपुत्र सलील देशमुख यांची नार्को टेस्ट व्हावी. ते या चाचणीला तयार असल्यास आपणही नार्को टेस्ट करण्यास तयार असल्याचे परमवीर सिंग यांनी म्हटले आहे. एकंदरीत या आरोप प्रत्यारोपांना आता चांगलीच धार चढल्याचे दिसत आहे. फडणवीस -देशमुख या दोघांनीही या संदर्भात आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचे आणि योग्य वेळ आल्यावर ते दाखविण्याचे आवाहन परस्परांना दिलेले आहे. आता सचिन वाझेच्या पत्रातून मोठे पवार आणि जयंत पाटील असेही संदर्भ पुढे आले असल्याने हे प्रकरण अधिक चिघळण्याची किंबहुना पुन्हा चौकशीचे शुक्लकाष्ट संबंधितांमागे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT