Nagpur Youth Beaten Up AI
नागपूर

Nagpur Crime | वर्गमैत्रिणीला इन्स्टावर हाय का टाकले? तिघांकडून तरुणाला मारहाण

राधाकृष्ण हॉल परिसरात शिवीगाळ करून वाद

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Youth Beaten Up

नागपूर : आपल्या मैत्रिणीला 'हाय' पाठविल्याच्या वादातून तिघांनी युवकावर हल्ला केल्याची घटना हुडकेश्वर हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल शाहू, क्रिष्णा शाहू व लक्की शाहू अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

करण सोनवापणे (वय १८) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. कार्तिक हा करणचा मित्र असून, तो शिक्षण घेत आहे. २८ जूनला कार्तिकने वर्गमैत्रिणीच्या इन्स्टाग्रामवर 'हाय' पाठविले. तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर मैत्रिणीने राहुलला सांगितले.

त्यानंतर राहुलने कार्तिकला भेटायला बोलाविले. राधाकृष्ण हॉल परिसरात राहुलने कार्तिकला शिवीगाळ करून वाद घातला. करणने वाद सोडविला. त्यानंतर दोघे घरी गेले. काही वेळाने राहुल व त्याच्या दोन साथीदारांनी करणला गाठले. काठीने त्याच्यावर हल्ला केला व पसार झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT