नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गणेशपेठ परिसरात गंगा अपार्टमेंटमध्ये असलेल्या दुकानाचा एक पोर्च कोसळल्याने वर्धा जिल्ह्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला. अजय अशोकराव इंगळे (वय 35, रा. चांदणी कोकडा, जि. वर्धा) असे या मृत युवकाचे नाव आहे. आज (दि.२) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. अग्निशमनच्या जवानांनी पडलेला मलबा बाजूला करून संबंधित युवकाला बाहेर काढले. व तातडीने मेडिकल रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, त्याचा सिमेंट मलब्याखाली दबून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले.