नागपूर - विरोधी पक्षनेते पदावरून विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वातावरण तापले. भास्कर जाधव की आदित्य ठाकरे अशीही चर्चा आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरात रंगली. तिसरे नाव सुनील प्रभू यांचेही आहे. स्वतः आदित्य ठाकरे यांनी ही पेरलेली बातमी असल्याचे सांगितले.
अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे सरकार आल्यावर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगत स्वतः मुख्यमंत्री आणि मुलाला कॅबिनेट मंत्री केल्याची टीका शंभूराज देसाई यांनी केली. राज्यमंत्री ऍड आशिष जैस्वाल यांनी महायुतीत उत्तम समन्वय असून महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेते पदाबाबत एकमत नसल्याचा,भास्कर जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलले जात असल्याचा आरोप केला.
याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे कुणाला मोठे करणार नाही अशी टीका निलेश राणे यांनी केल्यावर आमचे आम्ही बघून घेऊ, सरकार संकुचित भावनेने वागत आहे असे भास्कर जाधव म्हणाले. दुसरीकडे स्वतः आदित्य ठाकरे यांनी ही पेरलेली बातमी आहे. उलट एका गटातून 22 सदस्य बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत असा गौप्यस्फोट केला. यानंतर पुन्हा कडाक्याच्या थंडीत नागपुरात वातावरण तापले. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात पहिल्यांदा विरोधी पक्षनेता नसताना विरोधक राज्यातील विविध महत्वाच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकाही जोरात आहेत.