Maharashtra opposition leader Issues
नागपूर : विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव की आदित्य ठाकरे अशीही चर्चा आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरात रंगली. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे कुणाला मोठे करणार नाहीत, अशी टीका आमदार निलेश राणे यांनी केल्यावर आमचे आम्ही बघून घेऊ, सरकार संकुचित भावनेने वागत आहे, असे ठाकरे शिवसेने आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिउत्तर दिले.
तर दुसरीकडे एका गटातून 22 सदस्य बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, अशीही चर्चा ऐकायला येत आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी करून खळबळ उडवून दिली.
महाविकास आघाडी बैठकांना वेग
दरम्यान , विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात पहिल्यांदा विरोधी पक्षनेता नसताना विरोधक राज्यातील विविध महत्वाच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीला सोमवारी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनातील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात सुरुवात झाली. हिवाळी अधिवेशनातील रणनीती बाबत यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली.