Nagpur Wardha Road burning car
नागपूर: नागपूर - वर्धा रोडवरील अजनी चौक परिसरात आज (दि.२१) सायंकाळी एक बीएमडब्ल्यू कार जळून खाक झाल्याने खळबळ माजली. एक धावती कार पेट घेत असल्याने रस्त्यावर तारांबळ उडाली.
या बार्निंग कारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेमुळे एका मार्गावर वाहतूक खोळंबली. आग लागल्यानंतर कार चालक सुखरूप बाहेर निघाल्याची माहिती नागरिकांनी दिली. वायरिंग शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग विझविली.