पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरातील हिंसाचारात डोक्याला जबर मार बसल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा शनिवारी (दि.२२) इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इरफान अन्सारी (वय 38) असे त्याचे नाव असून तो वेल्डर म्हणून काम करीत होता. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास तो मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर इटारसीला जाण्यासाठी निघाला असताना रात्री सुरू झालेल्या दगडफेक,लाठीमार,अश्रूधूर आणि हिंसाचारात गंभीर जखमी झाला. रेल्वे स्थानक परिसरात तो पडून असताना पोलिसांनी त्याला अत्यवस्थ अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हापासून गेले सहा दिवस तो व्हेंटिलेटर होता आज त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
नागपुरात सोमवारी 17 मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीवरून झालेले आंदोलन आणि नंतर प्रत्युत्तरात दगडफेक, जाळपोळ आणि उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि त्याचा सहकारी मोहम्मद शहजाद खान अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.