Vadettivar supporters join BJP
नागपूर : माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे तथा चिमूर काॅग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
डोंगरे आणि पिसे यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
चंद्रपूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात रविवारी भाजपात प्रवेश केला. आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात हा प्रवेश झाला. बावणकुळे यांनी स्वागत केले.
यावेळी, माजी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया, राजु देवतळे, राजु पाटील झाडे, मनिष तुंपलीवार, डॉ. शाम हटवादे, कमलाकर लोनकर, ओम पाटील गणोरकर, पार्थ भांगडिया व इतर उपस्थित होते.