नागपूर विद्यापीठ Pudhari File Photo
नागपूर

Nagpur University Results | नागपूर विद्यापीठाचे प्रलंबित निकाल जाहीर करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू; 'भाजयुमो' चा इशारा

नागपूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल प्रदीर्घ काळापासून रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला

पुढारी वृत्तसेवा

RTMNU Pending Results 2026

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल प्रदीर्घ काळापासून रखडलेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. हे प्रलंबित निकाल तत्काळ जाहीर करण्यात यावेत, या मागणीसाठी बुधवारी (दि.१५) भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी, नागपूरच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

भाजप नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी व युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे यांच्या मार्गदर्शनात आणि विद्यार्थी आघाडी नागपूर शहर संयोजक शंतनु झाडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.​ विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच व्यावसायिक भविष्य धोक्यात आले आहे.

निकाल वेळेत न लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया, नोकरीच्या संधी, स्पर्धा परीक्षा आणि इतर महत्त्वाच्या बाबींमध्ये अडथळे येत आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून विद्यापीठ प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सर्व प्रलंबित निकाल त्वरित जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.​

पुढील चार दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्यात आले नाहीत, तर भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला. यावेळी भाजयुमो महामंत्री रितेश पांडे, आशु गुमगावकर, यश गौर, कौस्तुभ बैतुले, प्रणव चवंडके, प्रयाग पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT