Nagpur Burglary Case AI photo
नागपूर

Congress MLA Flat Robbery | काँग्रेस आ. संजय मेश्राम यांच्या फ्लॅटमध्ये चोरी; चोरट्याने चेकही वटविला

उमरेडचे काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांच्या विहीरगावमधील हेरिटेज अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये चोरी

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Burglary Case

नागपूर : उमरेडचे काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांच्या विहीरगावमधील हेरिटेज अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये चोरी करून चोरट्याने तीन लाखांच्या रोख रकमेसह धनादेश चोरी केला. विशेष म्हणजे त्याने चोरलेला हा धनादेश वटविण्याचाही प्रयत्न केला आणि यावेळी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

धनंजय गणवीर (रा. बांबूवन, हुडकेश्वर) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात आमदाराकडेच चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. पावसाळी अधिवेशन असल्याने मेश्राम हे सध्या मुंबईत होते.

सोमवारी पहाटे चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडले. बॅगेतील ७५ हजारांची रोख व धनादेश चोरी केला. लगेच सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास धनंजय हा धरमपेठेतील बँक ऑफ इंडिया येथे गेला. त्याने तीन लाख रुपये काढण्यासाठी हा धनादेश काउंटरवर दिला. सोबत ओडिशातील रेहमान नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्राची छायांकित प्रत जोडली.

धनादेश बघितल्यानंतर काउंटरवरील कर्मचाऱ्याने रोख तपासली. त्याच्याकडे त्यावेळी अडीच लाख रुपयेच होते. ही रक्कम त्याने ताब्यात घेतली. उर्वरित रक्कम आणण्यासाठी कर्मचारी बाजूला गेला. संधी साधून धनंजय बँकेतून बाहेर निघाला.

याचदरम्यान बैंक खात्यातून तीन लाखांची रोख काढण्यात आल्याचा एसएमएस आमदार मेश्राम यांना मिळाला. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. हुडकेश्वर पोलिसांचे लगेच धरमपेठेत दाखल झाले.काही वेळात धनंजय हा मास्क लावून पुन्हा बँकेत गेला. ५० हजार रुपये घेऊन बाहेर पडताच पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT