file photo
नागपूर

नागपूर : दोन एमडी विक्रेत्यांना अटक

Nagpur Crime News | ३ लाख ८४ हजाराचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन एमडी विक्रेत्यांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ८४ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रोशन भीमराव डोंगरे (२७, रा. समतानगर, जरीपटका) आणि तन्वीर अली वल्द शौकत अली (३२, रा. एमएम ताज ले-आऊट, वाठोडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पहिल्या घटनेत गुरूवार, १० एप्रिल रोजी सकाळी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जरीपटका हद्दीतील समतानगर, नारी रोड येथे धाड टाकून आरोपी रोशन डोंगरे याच्याजवळून २० ग्रॅम एमडी पावडर जप्त केले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक मोबाईल, दुचाकी असा एकूण १ लाख ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत त्याने आरोपी उबेर अन्सारी (३५, रा. हसनबाग) याच्याजवळून हे एमडी पावडर विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. पोलिस उबेरच्या शोधात आहेत.

दुसऱ्या घटनेत वाठोडा हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाने एमएम ताज ले-आऊट, सिम्बॉसिस समोर टाकलेल्या धाडीत तन्वीर अली याला ताब्यात घेत त्याच्याजवळून ३ ग्रॅम ७९ मिली ग्रॅम एमडी पावडर जप्त केले. आरोपीच्या ताब्यातून एमडीसह एक मोबाईल, वजन काटा व इतर साहित्य असा १ लाख १८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT