पवनी अभयारण्यात वाघिणीसह ५ शावकांना पर्यटकांच्या जिप्सींनी घेरल्याचा प्रकार समोर आला आहे.  Pudhari Photo
नागपूर

पवनी अभयारण्यात वाघिणीसह ५ बछड्यांना घेरले: चालक, गाइड निलंबित; पर्यटकांवर आजन्म बंदी

Pauni Karhandla Sanctuary | उच्च न्यायालयात सुमोटो दाखल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : उमरेड करहंडला पवनी अभयारण्यात (Pauni Karhandla Sanctuary) मावळत्या वर्षाला निरोप देताना ३१ डिसेंबररोजी सफारी दरम्यान एक वाघीण आणि तिच्या ५ शावकांना पर्यटकांनी अर्थात जिप्सींनी घेरल्याचे प्रकरण आता अधिकच गंभीर झाले आहे. ३ जिप्सी चालक आणि ३ गाईडला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पर्यटकांना या अभयारण्यात प्रवेश करण्यास आजन्म बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. आता या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत सुमोटो मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने सोमवारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. (Pauni Tiger Reserve)

या अभयारण्यात एफ २ वाघीण आणि तिच्या पाच शावकांना ३१ डिसेंबररोजी अनेक जिप्सीने सफारी दरम्यान घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कुही वन्यजीव परिक्षेत्रातील गोठणगाव गेटवर हा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन्यजीव प्रेमींनी वनविभागावर जोरदार टीका केली. जिप्सी चालक आणि गाईडला निलंबित करतानाच त्यांना अनुक्रमे २५ हजार, एक हजार रुपयाचा दंड ठोठावला. सहभागी सर्व व्यक्तींविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. (Pauni Karhandla Sanctuary)

उपसंचालक बोर व्याघ्र प्रकल्प यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आली आहे. अशा घटना टाळण्यासाठी आता जंगलात वनविभागाची गस्त अधिक कडक केली जाणार आहे. न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे, वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने याप्रकरणी स्वतः जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. अमाकास क्युरी अर्थात न्यायालयीन मित्राची नियुक्ती अद्याप झालेली नाही. आज (दि.७) न्यायालयात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकाना नोटीस देत समाज माध्यमावरून माहिती मिळण्याऐवजी ही माहिती वनविभागाला स्वतः थेट मिळावी, यासाठी यंत्रणा आहे का ?, असा सवाल वनविभागाला न्यायालयाने केला आहे. (Pauni Karhandla Sanctuary)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT