नागपुरातील मॉलमध्ये दहशदवादी शिरल्याचे माहिती समोर आली. File Photo
नागपूर

नागपूर : मॉलमध्ये दहशतवादी, मेडिकल चौक परिसरात धावपळ

शहर पोलिस यंत्रणा अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपुरातील मेडिकल चौक बस स्टॅण्ड, बैद्यनाथ चौक दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या व्हीआर मॉलमध्ये मंगळवारी (दि.९) रात्री दहाच्या सुमारास अचानक धावपळ उडाली. चार दहशतवादी आत शिरल्याच्या वृत्ताने अनेकांची भंबेरी उडविली. त्यानंतर तातडीने बीडीएस टीम, एनएसजी कमांडो, क्यूआरटी असा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला.

हा सर्व बंदोबस्त पाहून नक्कीच काहीतरी घडल्याची या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना खात्री झाली. बघ्याची मोठी गर्दी झाली, मात्र काही वेळातच शहर पोलीस यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेचा तालीम, मॉक ड्रिलचा हा भाग असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. याच पद्धतीने मंगळवारी (दि.९) विमानतळ तसेच रेशीम बाग येथील स्मृती मंदिर परिसरात देखील सुरक्षेची चाचपणी करण्यात आली. याशिवाय मध्यवर्ती रेल्वे स्थानक आणि विधान भवन परिसरातही अशा प्रकारची सुरक्षेची चाचणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरून नागपुरात काही अप्रिय घटनेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेला इनपुट तर नाही ना अशीही शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT