नागपूर : नागपूरसह विदर्भात पारा 44 अंश सेल्सिअस पार जात सूर्य आग ओकत असताना आज बुधवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाली.
एकीकडे हवामान विभागाने दोन तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असताना आज कडक उन्हाळ्यात अचानक पावसाळी वातावरण अनुभवास आल्याने नागपूरकरांची तारांबळ उडाली. वैशालीनगर परिसरात एका फटाका गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली.
पुढील ३ तासांत नागपूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, गारपीट, सोसाट्याचा वारा आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.