Farmer Drowning Pudhari AI
नागपूर

Nagpur Farmer Drowning | बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेला अन् धरणात बुडाला; शेतकऱ्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला

खापा पोलिसांसह ग्रामस्थांची दिवसभर शोधमोहीम; बावनगाव नदीकाठावर दगडात अडकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

Kocchi Dam Farmer Drowning

नागपूर : सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोच्छी धरणात बुडालेल्या ३६ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह अखेर दुसऱ्या दिवशी सापडला. बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात पडून बुडाला होता. पहिल्या दिवशी पोलिसांसह ग्रामस्थांनी मोठी शोधमोहीम राबवूनही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

मृताची ओळख दिनेश हिरूजी उईके (वय 36) रा. रिसाला, ता. सावनेर)अशी झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता दिनेश उईके हे बैलाला आंघोळ घालण्यासाठी कोच्छी धरण परिसरात गेले होते. यावेळी अचानक पाय घसरल्याने ते खोल पाण्यात पडले आणि पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दिवसभर धरण परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र, रात्रीपर्यंत त्यांचा मृतदेह हाती लागला नाही.

दरम्यान, आज १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता बावनगाव नदीच्या काठावर दगडात अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि ग्रामस्थांनी पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढला.

त्यानंतर मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दिनेश उईके यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास खापा पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT