RTO Inspector Arrested AI Photo
नागपूर

Nagpur RTO Bribe | आरटीओ वाहन निरीक्षक 500 रुपयांची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात

केळवद पोलिस स्टेशन अंतर्गत खुर्सापार चेक पोस्टवर सापळा रचून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Nagpur RTO Inspector Arrested

नागपूर : ट्रक चालक, मालकाकडून नेहमी तगादा लावत 500 रुपयांची लाच घेणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटर वाहन निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही घटना जिल्ह्यातील केळवद पोलिस स्टेशन अंतर्गत खुर्सापार चेकपोस्टवर घडली.

निरीक्षकाचे नाव साजन शालिग्रामजी शेंडे (वय ५०, रा. निर्मल नगरी, नंदनवन) असे आहे. त्याला वसुलीच्या कामात सहकार्य करणारा प्रवीण बाबुराव गायधने (वय ५०, रघुजी नगर, हुडकेश्वर) याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रारदाराकडे वारंवार लाचेची मागणी होत असल्याने व त्यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी 10 जून रोजी एसीबीकडे तक्रार केली. यानुसार रचलेल्या सापळ्यात गुरुवारी (दि.११) एंट्री पोटी ५०० रुपये, लाचेची मागणीपोटी अतिरिक्त 500 रुपये संबंधित सहकारी, खाजगी व्यक्तीच्या मार्फत स्वीकारताना ते जाळ्यात अडकले.

आरोपीकडील दोन मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून घर झडती प्रक्रियाही सुरू झाली. यासंदर्भात पोलीस ठाणे केळवद नागपूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७अ , १२अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया यांनी श्रीमती भारती गुरनुले, पोलीस उपअधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी राजकीरण येवले , पोलिस निरीक्षक आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT